कच्या तेलाचे दर घसरले

November 21, 2008 10:52 AM0 commentsViews: 3

21 नोव्हेंबरजागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर पन्नास डॉलर्स प्रति बॅरल्सपर्यंत खाली गेले आहेत. गेल्या साडे तीन वर्षांतला हा सगळ्यात खालचा दर आहे. जागतिक मंदीमुळं कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यानं हे दर कमी झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कच्च्या तेलाच्या कमी होणार्‍या किंमती लक्षात घेऊन ओपेक दरदिवशी पंचवीस लाख बॅरल्सपर्यंत कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याची शक्यता आहे.

close