कृपाशंकर सिंहांविरोधात प्रिया दत्त यांची हायकमांडकडे तक्रार

February 1, 2012 6:12 PM0 commentsViews: 17

01 जानेवारी

मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख निघून गेल्यावरसुद्धा मुंबई काँग्रेसमधल्या नेत्यांची नाराजी उफाळून येतेय. आपल्या समर्थकांना डावलले गेल्याने मुंबईतल्या खासदार प्रिया दत्त कमालीच्या नाराज झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी थेट काँग्रेस हायकमांड सोनिया गांधींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केलीये. या पत्रात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रार करण्यात आली. आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी देण्यापासून वंचित ठेवण्यात आलंय, आपल्याउत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या खेरवाडी, कलिना आणि चांदिवली भागातील वॉर्डांमध्ये समर्थकांना उमेदवारी नाकारण्यातआल्याची तक्रार त्यांनी केलीये. यासाठी त्यांनी कृपाशंकर सिंह आणि नसीम खान यांना जबाबदार धरलंय. प्रिया दत्त यांच्या नाराजीचंवृत्त पसरताच त्यांच्या शेकडो समर्थक त्यांच्या घरी जमले. तसेच दत्त यांनी समर्थक आमदार कृष्णा हेगडे आणि बाब सिद्दीकी यांची बैठक घेतली.

close