पराभवाचे रडगाणे सुरुच

February 1, 2012 1:21 PM0 commentsViews: 3

01 फेब्रुवारी

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतीय टीम अजूनही पराभवाचेच पाढे गिरवत आहे. टेस्टमध्ये 4-0 असा लाजिरवाना पराभव पचवून सुध्दा टीम इंडियाचे रडगाणे सुरुच आहे. पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीमचा 31 रन्सने पराभव झाला आहे आणि पुन्हा एकदा पराभवाचे कारण ठरलीय फ्लॉप बॅटिंग…ऑस्ट्रेलियाच्या 171 रन्सचा पाठलाग करताना भारतीय टीम निर्धारित वीस ओव्हरमध्ये सहा विकेटवर 140 रनच करु शकली. पहिल्याच ओव्हरमध्ये सेहवाग 4 रनवर आऊट झाला. त्यापाठोपाठ गंभीर, कोहली, रोहीत शर्मा आणि रैनाही आऊट झाले आणि शंभर रन करता करता सहा विकेट भारताने गमावल्या. अखेर महेंद्रसिंग धोणी आणि अश्विनने विकेटची पडझड तर रोखली. पण रन्सचा वेग राखणे त्यांना अशक्य होतं. टीमला 31 रन कमी पडले. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियन टीमने 4 विकेट गमावत 171 रन केले ते मॅथ्यू वेडच्या 72 रन्सच्या शानदार खेळीमुळे…भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची दुसरी टी-20 मॅच शुक्रवारी मेलबर्नला होणार आहे.

close