सोलापुरात मतदारराजाच देतोय उमेदवारांना पैसे !

February 1, 2012 2:19 PM0 commentsViews: 9

01 जानेवारी

निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी उमेदवारांकडून गुपचूप मतदारांना पैसे वाटले जातात असा प्रकार नेहमी घडतो. पण सोलापूरमध्ये सध्या उलटं चित्र पाहायला मिळतं आहे. मतदारच राजकीय पक्षांना मदत करत आहेत. महापालिकेची निवडणूक लढवणार्‍या कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारासाठी मतदारांनी तब्बल 20 लाख रुपये दिले आहे. नोट भी दो वोट भी दो..असा नाराच सीपीएमने दिला आहे. आणि विशेष म्हणजे महापालिकेत योग्य उमेदवार जायला पाहिजे यासाठी कष्टकरी आणि श्रमिक वर्गातील मतदार पैसे द्यायला तयार आहेत.

close