छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार

February 2, 2012 5:31 PM0 commentsViews: 8

02 फेब्रुवारी

वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी केली आहे. या घोटाळ्याची लेखी तक्रार कर्वेंनी आर्थिक गुन्हे विभागाकडे केलीय. ट्रस्टशी संबंधित मालमत्तेचा वापर भुजबळ स्वत:च्या फायद्यासाठी करत आहेत,आणि स्वत:ची जहागिरी असल्याप्रमाणे ते शिक्षण संस्थेचा वापर करत असल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. खासगी तसेच राजकीय समारंभासाठीचा खर्च ट्रस्ट उचलत आहे आणि गेल्या 29 सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला. भुजबळांनी सगळा खर्च ट्रस्टकडे जमा करावा अशी मागणी झाली. पण भुजबळांनी त्याला नकार दिल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे कर्वेंनी तक्रारीत म्हटलं आहे. या संदर्भातली एक याचिका कर्वेंनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. धर्मादाय आयुक्त हे ''क्वासीज्युडिशीअरी ऍथोरिटी'' आहेत. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्यानेच आपण एमईटी संस्था सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण कर्वेंनी दिलं आहे. या संस्थेत राहूनच कायदेशीर लढाई लढणार असल्याचे कर्वेंनी म्हटलंय.

close