कृपाशंकर यांच्याविरोधात प्रिया दत्त यांचे समर्थक रस्त्यावर

February 2, 2012 11:15 AM0 commentsViews: 1

02 फेब्रुवारी

निवडणुका जश्या जश्याजवळ येत आहे त्याच जोराने काँग्रेसमध्ये कुरबुरी वाढत आहे. अगोदर अजित सावंत यांचे आरोप आणि आता खासदार प्रिया दत्त यांची नाराजी यामुळे काँग्रेसचा गृहकलह चव्हाट्यावर आला आहे. या दोन्ही नेत्यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा पदश्रेष्ठींकडे वाचला आहे. आज मुंबईतल्या वांद्रे इथल्या खासदार प्रिया दत्त यांच्या ऑफिससमोर कृपा शंकर सिंग यांच्या विरोधात इच्छुक उमेदवारांनी घोषणाबाजी केली. यावेळी आपल्यालाही तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले नसल्याचे दत्त यांनी सांगितलं आहे. तिकीटवाटपाच्या प्रक्रियेत प्रिया दत्त यांच्या समर्थकांना वॉर्ड क्र 84, 85,150 या ठिकाणी दत्त यांच्या समर्थकांना डावलून कृपा शंकर सिंग यांनी मनमानी पद्धतीने तिकीट वाटप केल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहे. त्यामुळे या ठिकाणंी बंडखोरी करणार असल्याचे इच्छुक उमेदवारांनी सांगितले आहे.

close