टू जी घोटाळ्याची जबाबदारी संपूर्ण युपीए सरकारची – जेटली

February 2, 2012 12:14 PM0 commentsViews: 2

02 फेब्रुवारीटू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सरकारने जी भूमिका घेतली होती ती चुकीची होती हे सुप्रीम कोर्टाने आज सिद्ध केलं आहे. या घोटाळ्याची संपूर्ण जबाबादारी एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण युपीए सरकारची आहे अशी टीका भाजपचे राज्यसभेतील नेते अरूण जेटली यांनी केली. यामुळे सरकारच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.2 जी बद्दलच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

close