नागपुरात इमारती दुर्घटनेत मृतांची संख्या 7 वर

February 2, 2012 2:41 PM0 commentsViews: 1

02 फेब्रुवारी

नागपूरमधील कळमना मार्केटमध्ये कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सलग चवथ्या दिवशीही सुरु आहे. आतापर्यंत या इमारतीच्या ढिगार्‍याखालून 7 मृतदेह बाहेर काढण्यात आली आहे. सोमवारी दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर काल 5 मृतदेह बाहेर काढण्यात आली. अजूनही या ढिगार्‍याखाली 7ते 8 जण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे. या घटनेत 11 जण जखमी झालेत त्यांना मेओ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यातील काहींना उपचार करुन सुट्टी देण्यात आली. ढिगारा उपसण्याच्या कामी 300 कर्मचारी राबत आहेत. यामध्ये पालिका कर्मचारी, पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवानांचा समावेश आहे.

close