वर्ल्ड चॅम्पियन आनंदचं भारतात जंगी स्वागत

November 21, 2008 10:59 AM0 commentsViews: 6

21 नोव्हेंबर, मुंबईबुद्धिबळातलं सलग दुसरं विश्वविजेतेपद पटकावून ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद गुरुवारी मध्यरात्री भारतात परतला. या वेळी त्याच्या स्वागतासाठी चेन्नई विमानतळावर लोकांनी एकच गर्दी केली होती. रात्रीची वेळ असतानाही लोकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. नुकत्याच बॉन इथं झालेल्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये त्याने रशियन ग्रँडमास्टर ब्लादिमिर क्रामनिकचा साडे सहा विरुद्ध साडे चार पॉइंट्सनी सहज हरवलं. खरं तर या स्पर्धेपूर्वी आनंदचा फॉर्म तितकासा चांगला नव्हता. शिवाय सततच्या मॅचमुळे तो दमलाही होता. पण महत्त्वाच्या क्षणी आनंदने शानदार कामगिरी केली. आणि क्रामनिकवर दोन निर्णायक विजय मिळवले. विमानतळावर झालेल्या स्वागतामुळे आपण भारावून गेल्याचं आनंद मीडियाशी बोलताना म्हणाला.

close