घरकुल घोटाळ्याप्रकरणी गुलाबराव देवकरांची चौकशी

February 2, 2012 2:46 PM0 commentsViews: 2

02 फेब्रुवारी

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची आज पोलिसांनी चौकशी केली. या घरकुल योजनेत 29 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप आहे. त्यातल्या 90 संशयित आरोपींपैकी देवकर एक आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या चेंबरमध्ये देवकर यांचा इन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आला. या घरकुल प्रकरणाची सुरूवात झाली गुलाबराव देवकर हे नगराध्यक्षपदी असताना या जागी हा घरकुल प्रकल्प सुरू झाला त्या जागेला एन एल परवानगी नव्हती. तसेच कोणतीही अधिकृत परवानगी नसताना प्रकल्पाच्या जागा बदलण्यात आल्याचा ठपका देवकर यांच्यावर आहे.

close