शिवसैनिकांनी झेंडे जमा करुन केला पक्षाला रामराम

February 2, 2012 2:52 PM0 commentsViews: 5

02 फेब्रुवारी

महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. आणि आज पर्यंत जे घडले नाही अशी बंडखोरी झाली. याची सर्वात जास्त लागण झाली ती शिवसेनाला आणि आज पुण्यात पिंपरी चिचंवडमध्ये तिकीट नाकारण्यात आलेल्या नाराज शिवसैनिकांनी थेट खासदार आढळराव पाटील यांच्या कार्यालयावर धडक दिली. निष्ठावंताना डालवून पैसा घेवून नवख्यांना तिकीट वाटण्यात आल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केला. कार्यालयात कुणीही पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे शिवसैनिकांनी शिवसेनेचे झेंडे कार्यालयापुढे जमा करुन पक्षाला कायमचा रामराम ठोकला.

close