काँग्रेस ‘नाराजी’मुळे बेजार !

February 2, 2012 3:36 PM0 commentsViews:

02 फेब्रुवारी

काँग्रेस उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या पण अजूनही त्यांची पक्षांतर्गत धुसफूस काही थांबलेली नाही. आता निष्ठावंताना डावलल्याचे सांगत खासदार प्रिया दत्त यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही पक्षात नाराजी असल्याची कबुली दिली आहे. उमेदवारांची नावं जाहीर झाली, पण त्यांनी एबी फॉर्म दिले जात नसल्याचा आरोप पक्षातून होत आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर पक्षात निष्ठावंताच्या नाराजीमुळे काँग्रेस चांगलेच बेजार झाले आहे

निवडणूक कुठलीही असो तिकीटांचे वाटप झालं की काँग्रेस कार्यकर्त्यांमधली नाराजी उफाळून येते. कुण्या ना कुण्या नेत्याच्या समर्थकांना डावललं जातं. त्यात बरंच राजकारण होतं. आणि मग काँग्रेसचे नेते एकमेकांच्या नावाने शिमगा करतात. काँग्रेसमध्ये हे घडलंच आहे, याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीही दिली आहे. सत्तेत जे आहेत, ते आधी आपल्या गोतावळ्यांना तिकीटं मिळवून देतात. पण त्याचवेळी एखाद दुसरं काही कमी जास्त झालं की, प्रतिस्पर्धी नेत्याच्या नावाने टाहो फोडतात. हायकमांडच्या नावानंच नारेबाजी करत पक्षांतर्गत विरोधकांचा बिमोड करण्याचा प्रयत्न होतो, त्यामुळे त्यांची दखल पक्ष कसा घेणार हेच मोठं कोडं आहे.

close