मनसेच्या सभेची कोर्टाने याचिका फेटाळली

February 3, 2012 8:46 AM0 commentsViews: 5

03 फेब्रुवारी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचारसभेसाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मात्र कोर्टाने शिवाजी पार्क हे सायलन्स झोन आहे त्यामुळे परवानगी देता येणार नाही असं सांगत मनसेची याचिका फेटाळून लावली. येत्या 13 फेब्रुवारीला राज ठाकरे यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर आयोजित केली होती. मात्र कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे मनसेची प्रचार सभा आता होऊ शकणार नाही.

close