गेल्या निवडणुकात माणिकरावांनी तिकिटांसाठी पैसे घेतले – सावंत

February 3, 2012 9:30 AM0 commentsViews: 10

03 जानेवारी

मुंबई काँग्रेसचे नेते अजित सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांनी तिकीट विकले होते असा उघडउघड आरोप अजित सावंत यांनी केला. 2009 विधानसभा निवडणुकांमध्ये नादंगाव येथे अनिल अहिर हे चारशे मतांनी पराभूत झाले होते येथील जागा छगन भुजबळ यांच्या मुलासाठी दिली होती यावेळी सकाळी माणिकराव ठाकरे यांच्या घरी कोणी पैसे पाठवले होते ? याची आठवण सावंत यांनी करुन दिली. अजित सावंत यांनी तिकीटवाटपावरुन नाराज होऊन आपल्याच पक्षातील नेत्यांवर उघडउघड टीका केली. यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्याचे आदेश खुद्द प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले. पण माणिकरावांनी मला कोणतीही नोटीस दिली नाही आणि काही सांगण्यास संधीही दिली नाही असं सावंत म्हणाले.

close