चंद्रपुरात आजपासून साहित्याचा उत्सव

February 3, 2012 11:14 AM0 commentsViews: 2

03 जानेवारी

चंद्रपूरमध्ये आज 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन होतं आहे. न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते आज या संमेलनाचे उद्घाटन होतं आहे. उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. महिपसिंग यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यापूर्वी आज सकाळी परंपरेप्रमाणे ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत चंद्रपूरमधले रसिक तर सहभागी झालेच..पण मराठी अभिनेते रमेश भाटकर, सुबोध भावे, पॅडी कांबळे हेही सहभागी झाले होते. 32 वर्षांनंतर चंद्रपूरमध्ये साहित्य संमेलन होतं आहे. त्यामुळे चंद्रपुरात मोठा उत्साह आहे. आज संध्याकाळी उद्घाटनाच्या कार्यक्रमांनंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

close