मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची कोर्टात सुनावणी

November 21, 2008 11:06 AM0 commentsViews: 1

21 नोव्हेंबरमालेगाव स्फोट प्रकरणी सुधाकर चतुर्वेदीला नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं. पुरोहितच्या चौकशीत सुधाकर चतुर्वेदीचं नाव समोर आलं होतं. सुधाकर चतुर्वेदीची केस शिवडी कोर्टात ट्रान्सफर करावी अशी मागणी एटीएसनं नाशिक कोर्टात केली. ही मागणी मान्य करत नाशिक कोर्टानं चतुर्वेदीला शिवडी न्यायालयात शुक्रवारी चार वाजता हजर करण्याची परवानगी एटीएसला दिली आहे.मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी प्रसाद पुरोहित याला शुक्रवारी पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. बंदुकीचं बनावट लायसन दिल्याप्रकरणी त्याला दोन दिवसापूर्वी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्याला कोर्टानं दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे.

close