सरकार विसरलं शिवाजी महाराज, महात्मा फुलेंची जयंती

February 6, 2012 2:50 PM0 commentsViews: 4

06 फेब्रुवारी

यावर्षीच्या सरकारी कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या जयंतीचा उल्लेखच न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर पुण्यात संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने सरकारकडे एक निवेदन पाठवले आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यावे नाहीतर आंदोलन करू असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला. ब्रिगेडच्या या निवदेनाची दखल घेत अखेर महाराष्ट्र शासनाने संपूर्ण सरकारी कॅलंेडर नव्यानं छापण्याची माहिती सरकारनं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांना दिली आहे.

close