माथेफिरु संतोष मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

February 6, 2012 3:32 PM0 commentsViews: 10

06 फेब्रुवारी

पुण्यात एसटी महामंडळाची बस पळवून बेदकारपणे बस चालवणार्‍या माथेफिरू संतोष मानेला 14 दिवसांची मॅजिस्ट्रेट कोठडी सुनावण्यात आली आहे. आज शिवाजीनगर कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे. सध्या संतोष माने पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात आहे. माथेफिरु संतोष मानेनं प्रजासत्ताक दिनाच्या आदल्यादिवशी मनासारखी ड्युटी न मिळाल्यामुळे स्वारगेट स्टेशनमधून एसटीची बस पळवून नेली. आणि शहरात तब्बल एक तास दामटली. वाटेत येईल त्या वाहनांना धडका दिल्यात. या अपघात आठ निष्पाप लोकांचा बळी गेला तर 27 जण जखमी झाले होते.

close