‘पंतप्रधान’ लवकरच फेसबुकवर

February 6, 2012 5:48 PM0 commentsViews: 1

06 फेब्रुवारी

ट्विटरनंतर पंतप्रधान कार्यालय आता लवकरच फेसबुकवरही अकाउंट उघडणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्यांशी संपर्क साधण्याचा पंतप्रधान कार्यालयाचा विचार आहे. त्यासाठी आता लवकरच पंतप्रधान कार्यालयात एक छोटं ऑफिस उघडण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटचे 38 हजार फॉलोअर्स आहेत. सामान्य माणसाच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी आता लवकरच फेसबुकवरही अकाऊंट उघडण्यात येणार आहे.

close