मतदान केंद्रावर लॅपटॉप आणल्याने कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

February 7, 2012 9:22 AM0 commentsViews: 13

07 फेब्रुवारी

अलिबागमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राजवळ आणलेल्या लॅपटॉपवरुन बाचाबाची झाली. नवगाव मतदान केंद्रावर शेकाप कार्यकर्त्यांनी लॅपटॉप आणला, त्याला राष्ट्रवादीचे थळ इथले उमेदवार महेंद्र दळवी यांनी आक्षेप घेत हा लॅपटॉप जप्त करण्याची मागणी केली. त्यावर संतापलेले शेकापचे आमदार जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा नृपाल पाटील यांनी महेंद्र यांनाच जाब विचारण्याच प्रयत्न केला. घटनेचं चित्रीकरण करणार्‍या पत्रकारांनाही आडवून दमदाटी करण्याचा प्रकार घडला.

close