बुलढाण्यात गावकर्‍यांचा निवडणुकीवर बहिष्कार

February 7, 2012 9:30 AM0 commentsViews: 3

07 फेब्रुवारी

बुलडाणा जिल्ह्यातल्या पाचला गावातल्या लोकांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. निवडणुका आल्या की आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात विकास मात्र नाही याचा निषेध करत गावकर्‍यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. पाचला गावाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. गावात साधा रस्तासुद्धा नाही. मुलांना नदीचे पाणी पायी ओलांडून शाळेत जावं लागतं. गावात आजही एस.टी बस येत नाही. यावर निषेध म्हणून गावकर्‍यांनी गावाबाहेरच निषेधाचा फलक लावला आहे. गावाबाहेर फलक लावून गावकर्‍यांनी सर्वच राजकीय पक्षांवर बंदी घातली आहे.

close