गोपीनाथ मुंडे, पंडितअण्णा मुंडेंच्या गाड्यांवर दगडफेक

February 7, 2012 9:34 AM0 commentsViews: 42

07 फेब्रुवारी

बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे वाद पुन्हा एकदा उफाळला. जिल्हा परिषद मतदानाच्या आधी मुंडे कुटुंबीयांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांच्या गाड्यांवर काल संध्याकाळी दगडफेक करण्यात आली. दोन्ही गटांच्या गाड्यांची तोडफोड झाल्यामुळे दोघांनीही शिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. विशेष म्हणजे दोघांनीही एकाच वेळी तक्रार दाखल केली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे, पंडितअण्णा मुंडे, पंकजा मुंडे असं संपूर्ण मुंडे कुटुंब पोलीस ठाण्यात एकाच वेळी उपस्थित होतं. दरम्यान आमदार धनंजय मुंडे यांच्यासह 50 ते 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या उमेदवाराला धमकी देऊन मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

close