शिवसेना भवनासमोर राज ठाकरे घेणार सभा

February 7, 2012 10:18 AM0 commentsViews: 3

07 फेब्रुवारी

रस्त्यावरच सभा घेऊ असं जाहीर करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता दादरच्या शिवसेनाभवनासमोरच सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज यांनी यासाठी पोलिसांची परवानगी मागितली आहे. शिवसेना भवनासमोरील गडकरी चौकात 13 फेब्रवारीला प्रचारसभेसाठी परवानगी द्या असं राज यांनी म्हटलं आहे. मागील आठवड्यात मुंबई उच्चन्यायालयाने शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी मनसेची याचिका फेटाळून लावली होती. कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राज यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी देतात मग आम्हाला का देत नाही असा सवाल राज यांनी उपस्थित केला जर आम्हाला परवानगी मिळत नसेल तर आम्ही रस्त्यावरच सभा घेऊ कोणाला किती खटले दाखल करायचे आहे ते करा असं आव्हानही सरकारला दिले. आता थेट शिवसेना भवनाच्यासमोरच सभा घेण्याचा इरादा राज यांनी केला आहे.

close