माणिकराव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक

February 7, 2012 10:31 AM0 commentsViews: 2

07 फेब्रुवारी

यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर जवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. काल रात्री हा प्रकार घडला. यवतमाळचे पालकमंत्री नितीन राऊतही त्यावेळी गाडीत होते. ही दगडफेक शिवसेना आमदार संजय राठोड यांनी केल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. संजय राठोड यांनी आपली गाडी अडवली आणि दगडफेक केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आमदार संजय राठोड यांच्यावर नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राठोड शिवसेनेचे दिग्रसचे आमदार आहेत.

close