पंडितअण्णा मुंडेंना ओळखपत्र विचारले म्हणून कर्मचार्‍याला बाहेर काढले

February 7, 2012 11:16 AM0 commentsViews: 2

07 फेब्रुवारी

बीडमध्ये गोपीनाथ मुंडे विरुद्ध पंडित अण्णा मुंडे असा संघर्ष रंगला आहे. मुंडेंच्या नाथ्रा गावात पंडितअण्णा मुंडे यांना निवडणूक अधिकार्‍याने ओळखपत्र मागितलं म्हणून पंडित अण्णा मुंडे संतापले आणि त्यांनी सर्वोदय ढवळे या मतदान कर्मचार्‍यालाच बाहेर काढण्याचा हट्ट धरला. त्याला बाहेर काढत नाही, तोपर्यंत मतदान करणार नाही असंही त्यांनी सांगितलं. तिथल्या अधिकार्‍यांनीही ढवळेंना बाहेर काढून दुसर्‍या बूथवर पाठवलं. त्यानंतर पंडित अण्णांनी मतदान केलं. या सर्व प्रकारानंतर पंडितअण्णांना जेव्हा याबद्दल स्पष्टीकरण विचारण्यात आलं. तेव्हा पंडितअण्णांनी सारवासारव केली आपण कर्मचार्‍याची चौकशी करा असं म्हणालो, त्यांना बाहेर काढा असं म्हणालो नाही असं त्यांनी सांगितलं.

close