मैदानासाठी अजितदादांचाही राज ठाकरेंच्या सुरात सूर

February 7, 2012 12:05 PM0 commentsViews: 1

07 फेब्रुवारी

प्रत्येक पक्षाला सभेसाठी मैदान मिळायलाच हवं अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी केली तसेच यासाठी आयोगाला विनंती करणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मागील आठवड्यात राज ठाकरे यांनी निवडणुका हा लोकशाहीचा भाग आहे आणि यासाठी मैदान देण्यात यावी जर प्रत्येक ठिकाणी बंदी घालत असाल तर निवडणुका का घेता ? असा संतप्त सवालही राज उपस्थित केला होता. आज अजित पवार यांनी सुध्दा राज ठाकरे यांच्या सुरात सूर मिळवत मैदानासाठी आता आयोगाकडे विनंती करणार आहे.

close