केंद्रीय अर्थसंकल्प 16 मार्चला सादर होणार

February 7, 2012 12:14 PM0 commentsViews: 1

07 फेब्रुवारी

केंद्रीय अर्थसंकल्प पुढील महिन्यात 16 मार्च रोजी संसदेत सादर केला जाईल अशी घोषणा संसदीय कामकाज मंत्री पी. के. बन्सल यांनी केली आहे. तर रेल्वे बजेट 14 मार्चला सादर केलं जाणार आहे. बजेट अधिवेशन 12 मार्चपासून सुरू व्हावे अशी शिफारस सरकार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे करणार आहे. बजेट अधिवेशन 30 मार्चला संपेल आणि आर्थिक सर्व्हे 15 मार्चला सादर केला जाईल असं सांगण्यात आले आहे. पाच राज्यांच्या निवडणुका आल्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट पुढे ढकलण्यात आले होते.

close