मुंबईत 295 उमेदवार गुन्हेगार !

February 8, 2012 12:22 PM0 commentsViews: 4

08 फेब्रुवारी

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. मुंबईत एकूण 295 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट झालं आहे. मुंबईत एकूण 227 वॉर्ड आहेत. त्यात एकूण 3424 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 295 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. यात खंडणी, मारहाण, दरोडा या गुन्ह्यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या झोन क्रमांक 7 मध्ये म्हणजे घाटकोपर, भांडुप आणि विक्रोळी या भागात सगळ्यात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत.

close