अश्लील व्हिडिओ पाहणार्‍या 3 मंत्र्यांचे राजीनामे

February 8, 2012 4:11 PM0 commentsViews: 43

08 फेब्रुवारी

संसदीय लोकशाहीला काळीमा फासणारी घटना कर्नाटकामध्ये घडली. चक्क विधानसभेतच 3 मंत्री अश्लील व्हिडिओ पाहत असताना आढळले आहेत. यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर पक्षाने या तिन्ही मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सी.सी. पाटील, कृष्णा पलेमर आणि लक्ष्मण सावदी या तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. या सगळ्या प्रकरणाची पक्षानं गंभीर दखल घेतं. संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश भाजपाध्यक्ष नितीन गडकरींनी दिले आहेत. दरम्यान या मुद्यावरुन अधिवेशन भाजपला विरोधकांनी कोंडीत पडकलं आहे. या तिन्ही आमदारांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी विरोधकांनी आज कर्नाटक विधानसभेत गदारोळ घातला.

close