उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 64 टक्के मतदान

February 8, 2012 5:32 PM0 commentsViews: 4

08 फेब्रुवारी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आज 862 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. पहिल्या टप्प्यातल्या एकूण 55 जागांसाठी शांततेत मतदान झालं आहे. पण या मतदानात पावसाचा व्यत्यय आला. पहिल्या टप्प्यात 64 टक्के मतदान झालं. सगळ्यात कमी मतदान अयोध्या आणि बहरिचमध्ये झालं. पहिल्या फेरीत पूर्व उत्तर प्रदेशातल्या 55 जागांसाठी मतदान झालं. हा भाग बहुजन समाज पक्षाचा बालेकिल्ला मानला जातोय. पण सरकारविरोधातल्या असंतोषाचा आपल्याला फायदा होईल, असं काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला वाटतं आहे. तिकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तरप्रदेशमध्ये युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांनी आज उन्नाओमध्ये प्रचारसभा घेतली.

close