राज ठाकरे दुबळे, कमकुवत – उध्दव ठाकरे

February 8, 2012 12:51 PM0 commentsViews: 5

08 फेब्रुवारी

राज ठाकरे यांच्या शिवसेना भवनासमोर सभा घेणार असल्याचे जाहीर केलं राज यांच्या निर्णयाचा समाचार घेत शेवटी तुम्हाला शिवसेना भवनाचाच आधार घ्यावा लागला याचा अर्थ तुम्ही दुबळे, कमकुवत आहात स्वबळावर उभे राहुन बोलावे , असा शाब्दिक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. पण उद्धव ठाकरेंच्या या टीकेला राज ठाकरेंनी फारसं महत्त्व दिलेलं नाही. यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. उद्धव ठाकरेंनी आज महापालिका निवडणुकांसंदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघाने आज वार्तालापाचे आयोजन केलं होतं.यावेळी उध्दव यांनी फोडाफोडीचं राजकारण होत असतंच पण खालच्या पातळीवरची टीका कशाला असा सवालही अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीला विचारला.

close