सुप्रीम कोर्टाने मनसेची याचिका फेटाळली

February 9, 2012 10:01 AM0 commentsViews: 4

09 फेब्रुवारी

निवडणूक प्रचार सभा घेण्यासाठी मनसेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका फेटाळली होती. पण मनसेनं पार्कवर सभा घेण्यास परवानगी मिळावीच यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण शिवाजी पार्कवर सभा घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा आता पूर्ण होणार नाही. सुप्रीम कोर्टाने मनसेची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती एच. एल. दत्तू आणि न्यायमूर्ती अनिल दवे यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे.

येत्या 13 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा शिवाजी पार्कवर घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शिवाजी पार्कची निवड करण्यात आली होती. मात्र पार्क सायलेन्स झोन घोषित केल्यामुळे परवानगी देताच येणार नाही असं उच्च न्यायालयाने स्पष्ट करत मनसेची याचिका फेटाळून लावली. कोर्टाच्या या निर्णायवर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला कशी परवानगी देतात ? मग असा न्याय का ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता. आणि परवानगी मिळाली नाहीतर रस्त्यावर सभा घेईन कोणाला किती खटले दाखल करायचे आहे ते त्यांनी करावे असं आव्हानही सरकार दिले आज सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे राज ठाकरे आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सुप्रीम कोर्टाचा मनसेला दणका –

'आम्ही मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवतो आणि तुमची याचिका फेटाळतो. इको सेन्सिटिव्ह झोन्स तुम्हाला दिले तर सर्वच राजकीय पक्षांना द्यावे लागतील. त्यामुळे मूळ हेतू साध्य होणार नाही. दसरा मेळावा निवडणुकीच्या राजकारणासाठी नाही. आतापर्यंतच्या सभांना दिलेल्या परवानग्या पारंपारिक आणि धार्मिक कारणासाठीच देण्यात आल्या आहेत.'

close