पुण्यात अजित पवार आणि राज ठाकरेंच्या रोड शो दणक्यात

February 8, 2012 10:38 AM0 commentsViews: 7

08 फेब्रुवारी

पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात आज दोन धडाडीचे नेते उतरले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रोड शो मोठ्या धडाक्यात मार्गी लागले. राज ठाकरे यांच्या शो ला सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. राज ठाकरेंनी कसबा गणपतीच दर्शन घेऊन रोड शोला सुरूवात केली. यावेळी राज यांचे पत्नी आणि मुलगा अमित हे ही रोड शोमध्ये सहभागी झाले होते. तर अजित पवार यांच्या रोड शो मध्ये युवकांनी मोठा सहभाग घेऊन परिसर दणाणू सोडला तिकडे राज ठाकरेंच्या रोड शो ला मतदारांचा चांगला प्रतिसाद दिला. चौका-चौकात पुणेकरांनी ठाकरे कुटुंबीयांचे स्वागत केले.

close