राज ठाकरे,अजितदादांच्या रोड शो आयोजकांवर गुन्हे दाखल

February 9, 2012 10:16 AM0 commentsViews: 5

09 फेब्रुवारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोड शोचा धडाका लावला असताना अजित पवारांनीही काल पुण्यात रोड शो केला. पण आता या दोघांचे पुण्यातील रोड शो वादात अडकले आहेत. रोड शोमध्ये स्पीकरचा वापर आणि तीनपेक्षा जास्त वाहनं वापरल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या रोड शोच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. अजित पवार यांच्या रोड शोच्या आयोजकांवरही चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल बुधवारी राज यांनी पुण्यात रोड शो घेतला. यावेळी रोड शोमध्ये सहकुटुंब सहभागी होते.

close