गुजरात सरकार दंगली रोखण्यात अपयशी : हायकोर्ट

February 8, 2012 2:43 PM0 commentsViews: 4

08 फेब्रुवारी

2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना गुजरात हायकोर्टाने फटकारले आहे. दंगलीच्या काळात राज्य सरकारने निष्क्रियता दाखवल्याबद्दल कोर्टाने ताशेरे ओढले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. दंगलीवेळी उद्धवस्त झालेल्या धर्मस्थळांची बांधकामासाठी मदत देण्याचे आदेश कोर्टाने मोदी सरकारला दिले आहेत. अशा प्रकारच्या उद्धवस्त धर्मस्थळांची माहिती देण्याचे आदेश कोर्टाने प्रत्येक जिल्हा न्यायधीशांना दिले आहे.

close