विद्यार्थ्यांना नेणारी रिक्षा पेटली ; जीवितहानी नाही

February 9, 2012 7:48 AM0 commentsViews: 2

09 फेब्रुवारी

विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षाला आग लागल्याची घटना कोल्हापुरात घडली. टेंबलाईवाडी इथल्या परिसरात आज सकाळी सात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. पण या रिक्षात असणारे विद्यार्थी आणि ड्रायव्हर वेळीच बाहेर पडल्यामुळे कोणतेही जीवितहानी झाली नसल्याचे परीसरातील नागरिकांनी सांगितले आहे. रिक्षामध्ये विद्यार्थाचे शैक्षणिक साहित्य अर्धवट जळलेल्या आवस्थेत आढळून आलं आहे. या रिक्षामध्ये घरगूती गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी जागा आहे. पण त्यामध्येनंतर गॅस आढळून आलेला नाही. दरम्यान ही रिक्षा कोल्हापुरातील पिटर सिग्रेटो या व्यक्तीची असल्याचं स्पष्ट झालं आहे. या रिक्षामध्ये पिटरची दोन मुलं होती असं राजारामपुरी पोलिसाचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे घटनास्थळी अग्नीशमन विभागाचे अधिकारी होते. त्यांनी मात्र या रिक्षात सहा ते सात विद्यार्थाची दफ्तरं होती असं सांगितलं.

close