पुण्यात काँग्रेसच्या जाहीरनामा प्रसिध्द

February 9, 2012 11:56 AM0 commentsViews: 5

09 फेब्रुवारी

मुंबईत काल बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यापाठोपाठ आज पुण्यात काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत पुणेकरांना अनेक आश्वासनं दिली आहेत. पुण्यात झोपडीधारकांना पक्की घरं देणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. तर मध्यमवर्गीयांसाठी स्वस्त घरकूल योजनाही राबवली जाणार आहे. तसेच सचिन तेंडुलकरच्या नावाने आंतरराष्ट्रीय स्टेडियमही बांधलं जाणार असल्याचे काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर मोलकरणींचे प्रश्न सोडवण्यासाठी मोलकरीण भवनही बांधण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

close