पुण्यात काँग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

February 9, 2012 12:04 PM0 commentsViews: 3

09 फेब्रुवारी

पुण्यामध्ये काल बुधवारी रात्री मिलिंद काची आणि विजय मारटकर या दोन उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बेदम हाणामारी झाली. मिलिंद काची हे शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आता ते काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर मारटकर हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. शहरात प्रचारादम्यान या दोनही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु होती. काल गुरुवार पेठ परिसरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक सुर झाली पर्यायाने याचे रुपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी मिलिंद काचींना तर बंडगार्डन पोलिसांनी मारटकरांना अटक केली आहे.

close