परभणीत काँग्रेस-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

February 9, 2012 12:11 PM0 commentsViews: 1

09 फेब्रुवारी

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अंतर्गत वादामुळे परभणीजवळच्या गंगाखेडमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल मध्यरात्री तूफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटाचे 8 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तर भाजपचे नगरसेवक रामप्रभू मुंढे गंभीर जखमी झाले आहे.दोनच दिवसांपुर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान पार पडले. पण दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वादामुळे ही हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण जमावाने केलेल्या दगडफेकीत 3 पोलीस जखमी झाले आहे. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या जीपसह इतर 3 खासगी वाहनांची तोडफोड केली. कालच्या या वादामुळे गंगाखेड शहरात तणावाचे वातावरण आहे. इथली पूर्ण बाजारपेठ आज बंद होती. पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे.

close