कौल ठाण्याचा : अनधिकृत बांधकामांना 90 टक्के राजकीय आशीर्वाद ?

February 9, 2012 5:23 PM0 commentsViews:

09 फेब्रुवारी

भारताच्या लोकसंख्येत ठाणे जिल्ह्याने पहिला मान पटकावला. पण इथं वाढलेल्या लोकसंख्येमुळे राहण्याचा कळीचा मुद्दा बनला. पण जनतेच्या सेवेसाठी गर्दीत असलेल्या राजकारण्याच्या कृपेनं बिल्डरांनी मोठ-मोठे इमले बांधले आहे. यांच्या दुष्परिणामाची फळ मात्र सर्व सामान्य जनतेला भोगावी लागत आहे. आयबीएन लोकमत आणि 'जीएफके' मोडनं ठाण्यात सर्व्हे केला. तेव्हा लोकांनी बेकायदेशीर बांधकामांचा ठाणेकरांना वैताग आला आहे. आणि यासाठी राजकारणांचा 90 टक्के पाठिंबा असल्याचे स्पष्ट मत नोंदवलं आहे. त्याचबरोबर खराब रस्त्यांना महानगरपालिकाच जबाबदार आहे असं मत 95 टक्के ठाणेकरांनी व्यक्त केलं.

1. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना राजकीय पाठिंबा आहे का?होय – 90 % नाही – 10 %

2. शहरातील खराब रस्त्यांना महानगरपालिका जबाबदार आहे का?होय – 95 % नाही – 05 %

3. ठाणे शहरवासीय ट्रॅफिकच्या समस्येतून मुक्त होतील का?होय – 83 % नाही – 17 %

4. शहराभोवती असलेल्या झोपडपट्ट्या या सर्व राजकीय पक्षांसाठी व्होट बँक बनल्या आहेत का?होय – 71 %नाही – 29 %

close