अमिताभ बच्चन यांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया

February 9, 2012 5:37 PM0 commentsViews: 8

09 फेब्रुवारी

बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया होणार आहे. पण ही सर्जरी साधीच आहे, लोकांनी घाबरून जाऊ नये असं अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. अमिताभ यांना पोटदुखीचा गंभीर त्रास आहे. त्यासाठीच हे ऑपरेशन करण्यात येतं आहे. 69 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांचं उद्या सीटी स्कॅन होणार आहे. 1982 मध्ये 'कुली' सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी त्यांना पोटात ही दुखापत झाली होती. 2005मध्येही त्यांचं एक ऑपरेशन झालं होतं.

close