फलटणमध्ये इव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा संशय

February 11, 2012 11:43 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी

फलटणमध्ये इव्हीएम मशिन्सच्या कुलुपाला लावलेल्या स्लिप्स शाळेच्या मैदानात सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या स्लीपवर उमेदवारांची सही आहे. काँग्रेसच्या स्थानिक उमेदवारांनी याबाबत आक्षेप घेतला आहे इव्हीएम मशीनसोबत छेडछाड केल्याचा संशयही व्यक्त केला तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. निवडणुकीनंतर फलटणमधल्या मुधोजी विद्यालयात ही इव्हीएस मशीन ठेवण्यात आली होती. खासगी शाळांमध्ये ही मशिन्स का ठेवण्यात आली असा सवालही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या अहवालानुसार फलटणचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार गजानन गुरव यांना मतमोजणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर त्या अधिकार्‍यांची सखोल चौकशी करा नाहीतर आंंदोलन करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

close