‘मतं द्या,निधी देतो’अजितदादांचा नवा फंडा !

February 9, 2012 6:04 PM0 commentsViews: 1

09 फेब्रुवारी

राष्ट्रवादीच्या हाती सत्ता दिली तर बजेटमध्ये पिंपरी चिंचवडला जास्त निधी देऊ, असं आश्वासन अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडकरांना दिले. तसेच राज्याचं बजेट माझ्याच हातात आहे, असं सांगायलाही अजितदादा विसरले नाहीत. पिंपरीचिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे.

निवडणुकींच्या रणधुमाळीत सर्वच पक्षांची प्रचाराची गाडी सुसाट सुटली आहे. पण आचारसंहिताच्या धाकापोटी प्रत्येकांनी आपआपल्यापरिने काळजी घेत आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहिता भंग प्रकरणी या अगोदरच नारळ फोडलं. आचारसंहिता ज्या दिवशी लागू झाल्या त्या दिवशी संध्याकाळी अजितदादांनी पुण्यात भुमिपुजन करुन आचारसंहितेचा भंग केला. याची तक्रार शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे केली. यानंतर अजित पवार यांनी लेखी माफी मागितली आणि झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यावर आयोगाने अजितदादांना क्लीन चीट दिली. पण या माफीवरुन राज ठाकरे यांनी आक्षेप घेत थेट आयोगावरच टीका केली. आज पुण्यात राष्ट्रवादीची प्रचार सभा झाली या सभेत अजित पवारांचे रोखठोक भाषण झाले. ज्या शहरानं मला मोठं केलं, त्या शहराला नक्कीच सहकार्य मिळेल. या शहरातली गेल्या पाच वर्षांत झाली नाहीत इतकी कामं यापुढच्या पाच वर्षांत होतील. तुम्हा सत्ता राष्ट्रवादीच्या हाती द्या, कारण राज्याचे बजेट माझ्या हातात आहे, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडकरांना दिले. अजित पवारांचं आश्वासन म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

close