उत्तरप्रदेशमध्ये दुसर्‍या टप्यात 53 टक्के मतदान

February 11, 2012 7:48 AM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारी

उत्तरप्रदेशमध्ये आज दुसर्‍या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान झालं. यासाठी दुपारी 4 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या टप्प्यात संत कबीर नगर, मऊ, गोरखपूर, बलिया, देवरीया, गाझीयापूर, आजमगढ, कुशीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. जवळपास 20 हजार 425 मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडले. यामध्ये 3, 256 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. 59 जागांसाठी 1 हजार 98 उमेदवार रिंगणात उतरलेले आहे. यामध्ये 76 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर 31 आमदार आणि 24 माजी मंत्री निवडणूक लढवत आहेत.

close