अमिताभ बच्चन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

February 11, 2012 12:15 PM0 commentsViews: 4

11 फेब्रुवारी

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यावर आज मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांना गंभीर पोटदुखीचा त्रास होत होता त्यासाठी त्यांच्यावर आज एक सर्जरी झाली. आता बच्चन यांनी प्रकृती स्थिर आहे अशी माहितीही डॉक्टरांनी दिली. पोटदुखीच्या त्रासामुळे अगोदर बच्चन यांचं सी टी स्कॅन करण्यात आलं. आणि त्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1982 मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी त्यांना पोटात दुखापत झाली होती. त्यानंतर 2005 मध्येही त्यांचं याचसंदर्भात एक ऑपरेशन झालं होतं.

close