राज्यभरात थंडीचा कडाका ; फळांना फटका

February 10, 2012 9:50 AM0 commentsViews:

10 फेब्रुवारी

राज्याभरात थंडीचा कडाका आजही अनुभवायला मिळाला. काल रात्रीचं राज्यातीलं सगळ्यात कमी तापमान निफाडमध्ये 3 अंश इतक नोंदवलं गेलं आहे. पुण्यात 6.6 अंश इतकं कमी तापमान होतं. निफाडला काल गेल्या 25 वर्षापासूनचे सर्वात कमी तापमान 3अंश सेल्सीअस होतं. या थंडीचा सर्वात जास्त तडाका बसलाय तो द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. थंडीचा जोर असाच सुरु राहीला तर यावर्षी तयार झालेलं पिक धोक्यात येण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी ही माहिती दिली. थंडीचा हा कडाका आणखी एक ते दोन दिवस असाच राहू शकतो असंही त्यांनी म्हटलंय…

close