एस टी महामंडळाला आली जाग; चालकांची आरोग्य तपासणी सुरु

February 11, 2012 1:30 PM0 commentsViews: 9

11 फेब्रुवारी

माथेफिरू एसटी चालक संतोष मानेनं घडवलेल्या थरारनाट्यानंतर आता एसटी महामंडळाला जाग आली आहे. आजपासून महामंडळातील 41 हजार एसटी चालकांची प्राथमिक आरोग्य तपासणी राज्यभरातील एसटी डेपोंमध्ये सुरू होणार आहे. एसटी महामंडळाच्या इतिहासातील ही पहिली आणि सर्वात मोठी आरोग्य तपासणी आहे. संतोष माने प्रकरणानंतर महामंडळाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय तांत्रिक समितीने कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्याची सुचना महामंडळाला केली आहे . त्यानुसार राज्यातील 247 एसटी डेपोंमधल्या 41 हजार चालकांची आरोग्य तपासणीला आजपासून सुरुवात होत आहे. 3 मार्चपर्यंत चालणार्‍या या आरोग्य तपासणीसाठी 215 एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मधुमेह, रक्तदाब,डोळ्यांचे विकार यांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून मोफत औषध पुरवठा केला जाणार आहे. या तपासणीत कोणाला आजार असल्याचं आढळल्यास अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

close