पुण्यात युतीचा रडतपडत जाहीरनाम्याऐवजी पंचनामा पुस्तिका

February 11, 2012 1:37 PM0 commentsViews:

11 फेब्रुवारी

पिंपरी-चिंचवडमध्ये सेना-भाजप युतीने जाहीरनाम्याऐवजी पंचनामा या पुस्तिकेचं प्रकाशित केलं आहे. त्यात सत्ताधारी राष्ट्रवादीकडून 12 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पण पंचन्याम्यावर बोलण्याऐवजी महायुतीमधल्या उणीधुणी काढण्यात त्यांचा वेळ गेला. शिवसेेनेनं महायुतीचा धर्म मोडत भाजपच्या जागेवर एक उमेदवार लादल्याची नाराजी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी व्यक्त केली. तर, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच आम्ही काम करत असल्याचे नीलम गोर्‍हे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पिंपरी चिंचवड महायुतीतला तिढा अजूनही कायम असल्याचं स्पष्ट होतं आहे.

close