नाशिकमध्ये ट्रॅफिक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न

February 10, 2012 11:05 AM0 commentsViews: 5

10 फेब्रुवारी

नाशिकमध्ये एका रिक्षाचालकाने ट्रॅफिक पोलिसालाच जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. रविंद्र पवार असं या रिक्षाचालकाचे नाव आहे. सीबीसी एसटी स्टँडच्या परिसरात रविंद्र पवार आणि ट्रॅफिक पोलीस प्रभाकर सोनवणे यांच्यात पार्किंगवरुन वाद झाला. रस्त्यात इतर वाहनांना येण्यास अडचण होऊ नये म्हणून बाजूला रिक्षा लावं असं सोनवणे यांनी पवारला सांगितले. पण त्याने सल्ला जुगारुन पोलिसाशी अरेरावी सुरु केली. हा वाद इतका विकोपाला गेला की रिक्षाचालक पवारने गाडीत असलेली पेट्रोलची कॅन काढून सोनवणे यांच्या अंगावर ओतली. आणि स्वत:च्या अंगावर पण ओतून घेतली. तेथील काही नागरिकांनी वेळीच झडप घालून रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रिक्षाचालकाला आता अटक करण्यात आली आहे.

close