जोडीचा संसार अन् जोडीने चाललाय प्रचार !

February 11, 2012 1:52 PM0 commentsViews: 2

प्रशांत मानकर, अकोला

11 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात अनेक रंगतदार लढती होतात. भाऊ-भाऊ, दीर-भावजय, जावा-जावा अशा अनेक जोड्या निवडणुका लढवत असतात. पण अकोल्यात तर वेगवेगळ्या 6 वॉर्डातून पती-पत्नींच्या जोड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी प्रचार करणार्‍या या आहेत अकोल्यातल्या पती-पत्नींच्या जोडया… काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड एकाच प्रभागात सपत्नीक निवडणुकीला उभे आहेत. तर माजी नगरसेविका उषा विरक यांनाही त्यांच्या पतीसोबत एकाच प्रभागातल्या दोन वॉर्डांत तिकीट दिलं आहे. अशा तब्बल 6 जोड्या यंदा अकोल्याचा निवडणुकीत उतरल्या आहेत.

आर्थिक दिवाळखोरीमुळे अकोला महापालिका बरखास्त करण्यात आली होती. त्यातच यावेळी एकाच घरातल्या दोघांना तिकीटं दिल्यामुळे इतर इच्छुक नाराज आहेत. आतापर्यंत संसाराचा गाडा चालवणारे पतीपत्नी आता अकोला महापालिकेची गाडी रुळावर आणू शकतील का ? हे काही महिन्यात स्पष्ट होईल.

close